The गडविश्व
गडचिरोली,२० ऑगस्ट : स्थानिक नगरपरिषद अंतर्गत येणारे लांझेडा वार्ड अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी वार्डातील नागरिकांसह महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अहिंसक कृती, दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार, वेगवेगळे आंदोलन करून दारूविक्रेत्यांना धडा शिकवला जात आहे.
लांझेडा येथे देशी, विदेशी, मोहा दारू विक्री सुरू होती. त्यामुळे वॉर्डांत शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली. आरोग्यासह आर्थिक नुकसान व युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण हे लक्षात घेता दारू बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लांझेंडा वॉर्ड क्र 4 मध्ये वॉर्ड संघटन गठित करून दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दोनदा निवेदन देण्यात आले. त्या माध्यमातून दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. यामुळे 7 ते 8 जणांनी दारू विक्री बंद केली. परंतु, मुजोर दारू विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. तेव्हा दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी दारू विक्रेत्यांचे घरापुढे महिलांनी बैठक आंदोलन करून मद्यपीना दारू पिण्यापासून थांबविण्यात आले. दारूविक्री बंद करण्यासाठी दारू विक्रेत्यांवर वॉर्ड संघटनेच्या महिलांनी करडी नजर व पाळत ठेवून आहेत. वॉर्डातील दारूविक्री पूर्णपणे बंद करावी, अन्यथा थाळी बजाओ आंदोलन करण्याचा इशारा वॉर्ड संघटनेच्या महिलांनी दिला आहे. या संघटनेत शशिकला मडावी, मानका मेश्राम, गीता साहारे, मंदा मडावी, शेवंता टिंगूसले, पुष्पा मेश्राम, इंदिरा नैताम, शकुंतला सोमनकर, नलू नैताम, कल्पना नैताम, पूजा साहारे, परवता गेडाम, रवींद्र भुरले, विनोद सहारे, प्रदीप डोंगरे, विनोद टिंगूसले, नामदेव टिंगूसले, कवळु मेश्राम, दीपक वासेकर , नामदेव येलमुलवार, जमीर कुरेशी, सोनू सोमनकर, राज कुमरे हे सक्रिय सदस्य दारूमुक्त वॉर्ड करण्यासाठी लढा देत आहेत.