-गडचिरोली पोलिसांना निवेदन सादर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोगाव येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी ग्रापं, तंमुस, पोलिस पाटील व मुक्तिपथ गाव संघटनेने संयुक्तरित्या प्रयत्न सुरु केले आहे. त्याअनुषंगाने नुकतेच गडचिरोली पोलिस स्टेशन येथे निवेदन सादर करून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून आमच्या गावाला दारूविक्रीमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथे काही विक्रेते चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करीत असल्याने गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाई सुद्धा केली असूनही काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच मुक्तिपथ तर्फे गावात सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अवैध दारूविक्रीसंदर्भात परिस्थिती जाणून घेत दारूविक्रेत्यांविरोधात लढा देण्यासाठी गाव संघटना गठीत करण्यात आली. सोबतच गाव संघटनेचे कार्य व अधिकार समजावून सांगण्यात आले. त्यानंतर अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन विक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ठरविण्यात आले. यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य गरजेचे असल्याने गाव संघटनेसह गावातील पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून पोलिस निरीक्षक यांच्याशी अवैध दारूविक्री संदर्भात चर्चा केली. सोबतच निवेदन सादर करून आमच्या गावातील अवैध दारूविक्री बंदी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मुक्तीपथ गावसंघटना अध्यक्षा संगीता चापले, उपाध्यक्ष सलिम शेख, पोलिस पाटील उत्तम मुनघाटे, सरपंच रविंद्र उंदिरवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश मुनघाटे यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी व मुक्तिपथ तालुका संघटक मंगेश रामटेके, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम, तालुका प्रेरक मेघा गोवर्धन, बुधाबाई पोरटे उपस्थित होते.
(#thegadvishva #gadchirolinewa #gadchirolipolice #muktipath )