The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), २९ सप्टेंबर : शहरात ईद मिलादुन्नबी (पैगंबर जयंती) निमीत्य गूरूवारी सकाळी ८ वाजता येथील जामा मस्जिद येथून विविध देखावे व पैगंबर मोहम्मद यांचे गुणगान करीत यंग मुस्लिम जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटीचा वतीने मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक मस्जिद चौक येथून मार्गक्रमण करीत आझाद, चौक,आंबेडकर चौक, फव्वारा चौक, बाजार पेठ, हनुमान मंदिर, कूंभीटोला रोड, राणाप्रताप वार्ड मार्गे पून्हा जामा मस्जिद येथे पोहचत विसर्जित करण्यात आली.
मिरवणूकीत मक्का व मदीना येथील देखावे तसेच पैगंबर मोहम्मद यांचे गुणगान करीत शिस्तबद्ध मार्गक्रमण करणारे भाविक हे वैशिष्टे होते. मस्जिद येथे समाजाचे ज्येष्ट सदस्य पिंटू शेख यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यावर्षी धार्मिक हज यात्रा पूर्ण करून परत आलेले मूझफ्फर बारी व जामा मस्जिद चे इमाम यांचा कमेटीचा वतीने शाल व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी बूधवारी रात्री आझाद चौक येथे जलसा चे आयोजन करण्यात आले होते. येथे प्रेषित मोहम्मद यांचे जिवनकार्य व त्यानी मानवतेची दिलेली शिकवण या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात जामा मस्जिद चे अध्यक्ष मसूद शेख, उपाध्यक्ष बबलू हूसैनी, हाजी अमानूल्लाह खान, हाजी नवाब हाशमी, हाजी सलीम खाणानी, हाजी बब्बू मस्तान, हाजी मूर्तूजा शेख, हाजी मकसूद खान, अयुब खान, सईद शेख, आबिद शेख, शफीऊल्लाह खान, यंग मुस्लिम कमेटीचे अध्यक्ष न्याज़ सय्यद, उपाध्यक्ष तौकीर शेख, सचिव काशीद कूरैशी आसीफ शेख, बिलाल खाणानी, साजीद शेख, शादाब खान, शमीम शेख, तौसीफ शेख,असद खान, शहेबाज शेख, मून्ना शेख, रेहान खान, अयाज़ सय्यद,ओमी खान,जमील शेख, सोहेल खान, इरशाद अली सय्यद, फाजील शेख,नवेद शेख, ज़ोहेल खान, हमजा खान, रेहान पठान, रज़ा खान,राजा शेख तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.