The गडविश्व
गडचिरोली, दि.११ : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड व जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची महिला आघाडी कार्यकारिणी नुकतीच नियुक्त करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्यां तारका जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे.जांभुळकर ह्या सामाजिक क्षेत्रात जिकरीने कार्यरत असणाऱ्या मूलनिवासी महिला संघ जिल्हाध्यक्ष नंतर महिला मैत्री संघ संयोजक असा प्रवास करत आता राजकीय स्तरावर आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याच्या उद्देशाने BRSP जिल्हाध्यक्ष पदी त्या विराजमान झाल्या.
त्याचप्रमाणे महिला आघाडी जिल्हा सचिव म्हणून शोभा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी विभा उमरे व करुणा खोब्रागडे, जिल्हा संघटक पदी प्रीती इंगळे यांची निवड करण्यात आली.
लवकरच महिला आघाडीच्या वतीने भव्य महिला क्रांती मेळावा गडचिरोली मध्ये आयोजित करणार असून, आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांना सक्रिय होण्याचे आवाहन यावेळी तारका जांभुळकर यांनी पत्रकातून केले.
पक्षाचे विदर्भ महिला सह संयोजक डॉ. पूनम घोनमोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.