गडचिरोलीत अतिक्रमण दलाल सक्रिय, अतिक्रमणीत जागा देतात किरायाने ?

1429

– नगर परिषद अतिक्रमण हटाव मोहीम वाऱ्यावर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून ती जागा चक्क किरायाने देत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली असून सदर प्रकाराने शहरात अतिक्रमण दलाल सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नगर परिषदेमार्फत शहरात अतिक्रमण हटाव मोहिम काही महिन्यांपूर्वी राबविली होती. यावेळी शहरातील अनेक भागातील अतिक्रमणे हटविण्यात आले होते मात्र आता पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत आहे. याकडे मात्र नगर परिषदेचे दुर्लक्ष असुन अतिक्रमण हटाव मोहीम निष्फळ ठरल्याचे दिसते. नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्यासाठी एक वाहन तयार केले आहे. दररोज ते वाहन शहरात फिरविल्या जाईल त्यामध्ये नगर परिषदेचा एक कर्मचारी असेल व कारवाई करेल असे सांगण्यात आले होते. शहरात सदर वाहन तपासणी करीत असले तरी मात्र शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या अतिक्रमणाकडे त्या वाहनातील कर्मचाऱ्याची नजर भिरकत नसेल काय ? हा संशोधनाचा विषय असला तरी आता शासकीय जागेवर अतिक्रमण करून ती जागा किरायाने देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. सदर जागा किरायाने देत असतांना सुरूवातील काही रक्कम हि डिपॉजिट स्वरूपातही मागितल्या जात असल्याची माहिती सुत्रांव्दारे प्राप्त झाली आहे. एकुणच सदर प्रकार हा गंभीर असुन नगर परिषदेने या गंभीर प्रकाराची दखल घेवून उचित कारवाई करावी अन्यथा सदर जागा आज किरायाने दिली जात आहे भविष्यात ती जागा काही रक्कम देवून विक्री केली जाण्याचीही शक्यता नाकारातु येत नाही.

‘या’ ठिकाणी आहेत अतिक्रमण

शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरातील मुख्य मार्गालगत, धानोरा मार्गावर तसेच कॉम्पलेक्स परिसरातील शासकीय रूग्णालया समोर मुख्य मार्गालगत, आयटीआय परिसर, जिल्हा परिषद परिसर, जिल्हा न्यायालय ते टि. पाईंट परिसर या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे राष्ट्रपती आले असतांना अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती.

(#thegdv #thegadvishva #gadchirolnews #atikramnhatav #Kathua #Hemant Soren #Mumbai rains #CMF Phone 1 #France election #Supreme Court #YES Bank share #RVNL #NEET news )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here