गडचिरोली : बेकायदेशिर असतांनाही बॅनर होर्डीग्सचे रस्ता दुभाजकांवर अतिक्रमण

1407

– कारवाई कोण करणार ?
The गडविश्व
गडचिरोली, ६ सप्टेंबर : रस्ता दुभाजकावर बॅनर होर्डींग्स लावणे बेकायदेशिर आहे त्यामुळे अपघात होतात असा फलक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली तर्फे लावण्यात आला आहे. मात्र असे असतांनासुद्धा रस्ता दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबावर बॅनर होर्डींग्स लावलेले दिसत असल्याने त्यावर कारवाई कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकांवर बॅनर होर्डींग्स लावले असतांना संबधित विभागाच्या निदर्शनास येत नाही का ? अथवा त्यास संबधित विभागाची मुकसंमती तर नाही असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या रस्ता दुभाजकांवर शुभेच्छा संदेश तसेच काही दुकांनाच्या बॅनर होर्डींग्सचे अतिक्रमण दिसुन येत असून याकडे मात्र नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असुन अतिक्रमण कारवाई थडंबस्त्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले त्याचबरोबर रस्ता दुभाजकावरील बॅनर होर्डींग्सही हटवत ताब्यात घेतले. दरम्यान या करावाई नंतर काही दिवस बॅनर रस्तादुभाजकांवर दिसले नाही मात्र आता पुन्हा रस्ता दुभाजकांवर बॅनर, होर्डींग्स दिसुन येत आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकारण गडचिरोली तर्फे शहरातील रस्ता दुभाजकांवर बॅनर, होर्डींग्स लावणे बेकायदेशिर आहे त्यामुळे अपघात होतात याबाबत जनजागृती केली मात्र तरीसुध्दा याला बगल देत रस्ता दुभाजकावरील पथदिव्यांना मात्र शुभेच्छा संदेश देणारे तसेच इतर बॅनर होर्डींग्स लावलेले दिसतात. रस्ता दुभाजकावरील पथदिव्यांचे खांब हे जणू बॅनर होर्डीग्स लावण्याचे साधनच झाले असे दिसुन येत आहे. रात्रोच्या सुमारास पथदिवे बंद राहत असले तरी मात्र त्या पथदिव्यांच्या खांबाचा वापर बॅनर होर्डिंग्स लाावण्यासाठी चांगल्याप्रकारे होत असल्याचे दिसते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संदेशाकडे बगल

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहरात जनजागृती करण्यात आली. त्यात रस्त्यांवर असलेल्या मोकाट गुराविषयी जनजागृती तसेच मोटार वाहनासंदर्भात जनाजागृती करण्यात आली. बॅनरच्या माध्यमातुन विविध संदेश देण्यात आले. प्रवास करतांना घ्यावयाची काळजी इत्यादी. त्यात रस्त दुभाजकावर कोणत्याही प्रकारचे बॅनर, होर्डिग्स लावणे बेकायदेशिर आहे त्यामुळे अपघात होतात असे सुध्दा फलक लावले असतांनासुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संदेशाकडे बगल देत रस्ता दुभाजकावरील पथदिव्यांच्या खांबाना बॅनर होर्डीग्स लावण्यात येत आहे. त्यामुळे अशा बॅनर होर्डींग्सवर आता कारवाई कोण करणार ? असा प्रश्न सुध्दा उपस्थित होत आहे.

अपघाताची शक्यता 

रस्ता दुभाजकांवर बॅनर होर्डीग्स लावले असल्याने पलीकडील कधीकाळी दिसत नाही. प्रवास करत असतांना नागरिकाचे लक्ष त्या बॅनरकडे जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. कधी ते बॅनर रस्त्यावरही पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सुध्दा अपघात होण्याची शक्यता आहे.

#gadchirolinews #hording banner #nagar parishad gadchiroli #jilha vidhi seva pradhihkarn gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here