– बालकात आनंदाचे वातावरण
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १९ जून : द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बालधम्म संस्कार शिबिराला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून धानोरा येथे सम्राट बुद्ध विहारात १७ जून रोजी घेण्यात आलेल्या धम्म शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
तीन दिवसीय बाल धम्म संस्कार शिबिरात बौद्ध उपासक उपासिका व बालकात धम्म संस्कार वाढीस लागणे, बुद्ध तत्त्वज्ञानाची माहिती होणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती होणे, धम्माचे आचरण शिस्त पालन याची माहिती होणे, मैत्री करुणा शांती समता न्याय हक्काची माहिती होणे, तसेच शिक्षणासोबतच धम्म संस्काराची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन बालधम्म शिबिराचे मुख्य मार्गदर्शक बौद्ध समाजाचे अध्यक्ष डी बुधिस्त सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी बाल धम्म संस्कार शिबिरात व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षस्थानी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धानोरा तालुका शाखाचे अध्यक्ष खुशालराव ढवळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध समाजाचे सचिव देवनाथ मशाखेत्री, उपाध्यक्ष शिवकुमार भाईसारे, बौद्धाचार्य किसनराव मशाखेत्री, घनश्याम मशाखेत्री, प्रकाश बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी मशाखेत्री, शर्मिला मशाखेत्री, भूमिका सालोटकर, संगीता सोरते धम्म प्रशिक्षिका हेमा सहारे उपस्थित होते. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमाना दीप प्रज्वलन बाल धम्म शिबिरा रथी यांचे हस्ते करण्यात आले. सामूहिक त्रिशरण पंचशीला वंदना घेण्यात येऊन, बालकांना धम्म आचरणाचे महत्त्व विशद करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन कार्याची थोडक्यात माहिती देण्यात आली. धम्म संस्काराची गरज व महती सांगण्यात आली. १७ ते १९ जून २०२३ या तीन दिवस चालणाऱ्या बालधम्म संस्कार शिबिराला द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर विभागीय अध्यक्ष विजय बनसोड यांचे मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष मेश्राम जिल्हा संस्कार विभाग प्रमुख काका गडकरी यांचे नेतृत्वात चालणाऱ्या बाल धम्म संस्कार शिबिरात बुद्ध धम्म आचरणाची गोडी, डॉक्टर बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांची सांगड बालमनावर होऊन आदर्श जीवनशैलीची नव पिढी निर्माणचे कार्य आपण सर्व मिळून करूया असा संकल्प करून त्रिशरण पंचशील वंदना घेऊन बाल धम्म संस्कार शिबिराचा प्रथम दिवस पार पडला. बाल धम्म संसार शिबिराला शिबिरार्थी चाहात मशाखेत्री, सारा सहारे, मही इंगोले, विधी पिल्लेवान वेदांती उंदीरवाडे, मंगला उंदीरवाडे, कनिष्का मशाखेत्री, साची ढवळे, विधी भाऊसारे, निर्भय भैसरे, विमान गव्हर्नर मृगल गव्हर्नर मानवमशाखेत्री, तन्मय उंदीरवाडे, सम्यक सहारे, दिव्या मशा खेट्री, गुंजन मशाखेत्री, धीरज उंदीरवाडे, करण मशाखेत्री, युग माशाखेत्री, विराज ढवळे इत्यादी शिबिरार्थी हजर होते.