The गडविश्व
गडचिरोली, २४ मार्च : समाजातील क्षयरोगाबद्दल असलेली गैरसमज दूर होऊन क्षयरोग बद्दल शास्त्रीय माहिती देण्याच्या अनुषंगाने होप फॉऊडेशन, सिरोंचा या सेवाभावी संस्थेतर्फे राजश्री शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे “क्षयरोग निर्मूलन मध्ये माझी जबाबदारी,/”वाढते क्षयरोग एक आरोग्यविषयक समस्या ” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर निबंध स्पर्धेत सहभागी विजेत्याना आज बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ प्रेमाताई आईचंवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शारदा भडगे, होप फॉउंडेशन सिरोंचा चे संचालक नागेश मादेशी, क्षयरोग पर्यवेक्षक स्नेहा गायकवाड, समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार, राजश्री शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजेंद भूरे, प्रा.कोवासे, प्रा. श्यामकुळे, प्रा. पुलूलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी होप फॉऊडेशन सिरोंचा चे संचालक नागेश के.मादेशी यांनी उपस्थित विद्यार्थीना, क्षय रोगाबद्दल अजूनही आपल्या समाजात खूप गैरसमज आहे आपण एक विद्यार्थी म्हणून गैरसमज दूर केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. हा आजार फक्त गरिबांना होतो असे अनेक लोकांना वाटते असते पण असे नसून हा आजार कोणालाही होऊ शकतो त्यामुळे आजार बद्दल न लाजता त्वरित रुग्णालय जाऊन तपासणी आणि क्षय रोगाचे निदान झाले तर ६ महिने उपचार केले पाहिजे. क्षय रुग्णांना मानसिक आधार दिला पाहिजे, त्याना भेदभाव करू नये ते पण आपल्या समाजातील घटक आहेत असे मार्गदर्शन केले.
डॉ. शारदा भडगे यांनी, क्षयरोगाचे लक्षणे, निदान, कारणे, उपाय याबद्दल मार्गदर्शन केले. क्षय रोग पर्यवेक्षक स्नेहा गायकवाड यांनी उपस्थित विध्यार्थीना, या वर्षीचे जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य क्षय रोगाला संपूया असे असून यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करावे असे मार्गदर्शन करून क्षय रुग्णांना असलेल्या निक्षय पोषण आहार आणि संजय गांधी निराधार योजना बद्दल मार्गदर्शन केले.
प्रेमा आईचंवार यांनी, अमिताभ बच्चन सारख्या सिनेमा अभिनेता ला क्षय रोग झालेला असून हा आजार रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने होतो म्हणून आपण सर्वांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवावी, सकस आहार घ्यावा असे मार्गदर्शन करून क्षयरोग निर्मूलन साठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन केले. निबंध स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक कु. अस्मिता योगराज बुरे, द्वितीय क्रमांक चैताली लालाजी पिपरे, तृतीय क्रमांक सृष्टी घनश्याम भांडेकर यांनी पटकविले तर प्रोत्साहन पर पारितोषिक शीतल शील, गुड्डी संजय वासेकर, रोहन विश्वास यांनी देण्यात आले. सर्व विजेत्याना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशबू टिकले आभार कु. जागृती चोखारे यांनी मानले.
राजश्री शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राध्यापक, कर्मचारी, आणि विद्यार्थी सहकार्य केले.