पालोरा येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

255

– अध्यक्षस्थानी सौ.वर्षाताई नितीन प्रधान यांची सर्वानुमते निवड
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ३ डिसेंबर : जि.प.म.प्रा.शाळा पालोरा (आरमोरी) येथे बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचे अधिकार अधिनियम २००९ कलम २२ नुसार शाळा व्यवस्थापन समिती ३ डिसेंबर रोजी स्थापन करण्यात आली.
यावेळी सर्व पालक व मुख्याध्यापक पी.ऐ. हलामी यांच्या उपस्थितीत अकरा सदस्स्यीय समीती स्थापण करुन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली असता सौ. वर्षा नितीन प्रधान यांची अध्यक्षपदी तर संजय विठोबा धोटे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सदस्यपदी भाग्यश्री दुर्वे, गंगोत्री चौधरी, दिपाली मडावि, माधुरी टेकाम, ममिता तोंडरे, मारोती मेस्राम, ज्ञानेश्वर ढोरे, सूर्यभान मडावी, विलास गेडाम.यांची निवड पी.ऐ.हलामी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूर करून शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

(The Gadvishva)  ( Gadchiroli News Updates) (Armori)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here