– तिघांना दुसऱ्यांदा सभापतीपद
The गडविश्व
एटापल्ली, २२ फेब्रुवारी : नगरपंचायतच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण झाल्याने दुसऱ्यांदा सभापती निवडण्यासाठी सोमवारला सभेचे आयोजन केले होते.
त्यात सर्व सभापतीची निवड अविरोध झाली. विशेष म्हणजे तिघांना दुसऱ्यांदा विषय समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली.
नगराध्यक्ष दिपयंती निजान पेंदाम यांच्यासह उपनगराध्यक्ष मीना पोचरेड्डी नागुलवार यांच्याकडे आरोग्य व स्वच्छता समिती व तसेच नगरसेवक राघवेंद्र राजगोपाल सुल्वावार यांच्याकडे बांधकाम सभापती तर किसन झुरू हिचामी यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण सभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या तारा लोकनाथ गावडे यांनी यावेळी माघार घेत कविता ब्रम्हा रावलकर यांना संधी दिली. व महिला व बालकल्याण उपसभापती जाणूबाई गावडे यांची अविरोध निवड झाली.
पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार जे.जी.काडवाजीवार यांनी कामकाज बघितले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv)