चातगाव येथील पोटविकार ओपीडी’ ला उत्कृष्ट प्रतिसाद

189

The गडविश्व
गडचिरोली, ८ मार्च : चातगाव येथील सर्च रुग्णालयात नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ. सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने नियमित पोटविकार ओपीडीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोटविकार ओपीडी आयोजित करण्यात आलेली आहे. ४ मार्च २०२३ ला झालेल्या पोटविकार ओपीडीचा ६७ रुग्णांनी लाभ घेतला आहे.
या ओपीडीमध्ये पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता,शौचातून रक्त पडणे,कावीळ (पांढरी व पिवळी), रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल,मळमळणे,आतड्या मधील सुज,पातड शौच,अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, पोटात पाणी असणे अश्या आजारावर उपचार करण्यात आला.
काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये पोटविकार ओपीडी’ सुरुवात करण्यात आली आहे. तरी या ओपिडीचा लाभ रुग्णांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यावा, असे आवाहन सर्चच्या वतीने करण्यात आले आहे.

(The gadvishva) (The gdv) (Gadchiroli News updates) (muktipath) (serch opd) (women’s day)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here