गडचिरोली मलेरिया निर्मूलन योजनेचे धोरण आखण्यासाठी तज्ञांची बैठक

85

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्हा हा भारतातील सर्वात जास्त मलेरियाग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. अभय बंग सर्च, यांच्या अध्यक्षतेखाली मलेरिया निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना केली. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच टास्क फोर्सला गडचिरोलीमध्ये अंमलबजावणीसाठी तीन वर्षांचा निर्मूलन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
टास्क फोर्सने गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्यासाठी तज्ञ तांत्रिक सल्लागार बैठकीचे आयोजन केले होते. शोधग्राम, सर्च येथे १९ आणि २० ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ICMR ची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च [NIMR], मध्य प्रदेशचा मंडला प्रकल्प, गेट्स फाउंडेशन आणि राज्य आणि जिल्हा आरोग्य संस्थांचे अधिकारी, सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ [सर्च] उपस्थित होते.
जिल्हा परिषद गडचिरोलीचे सीईओ आयएएस आयुषी सिंग, एनआयएमआरचे संचालक डॉ. अनुप अन्वीकर, आणि मंडला प्रकल्पाचे डॉ. अल्ताफ लाल ऑनलाइन या बैठकीत सामील झाले. डॉ शाम निमगडे, एडीएचएस, मलेरिया कार्यक्रम, नागपूर, डॉ. प्रताप शिंदे, डीएचओ गडचिरोली, डॉ. धवल साळवे, प्राचार्य एनएचएम प्रशिक्षण केंद्र, नाशिक, माजी डीएचओ, गडचिरोली, डॉ. हेमके, डीएमओ गडचिरोली आणि त्यांची टीम बैठकीला उपस्थित होती.
गडचिरोली जिल्हा निर्मूलन योजनेसाठी तज्ज्ञांच्या शिफारशी, पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र सरकारला सादर केल्या जात आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here