The गडविश्व
नवी दिल्ली, २८ मार्च : करदात्यांना पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठीची आणखी काही वेळ देण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी ३० जून, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्याद्वारे करदाते परिणामांना सामोरे न जाता आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठी विहित प्राधिकरणाला त्यांचे आधारकार्ड सूचित करू शकतात. याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.
प्राप्तिकर कायदा, १९६१ (‘कायदा’) च्या तरतुदींनुसार १ जुलै, २०१७ रोजी पॅनकार्ड वाटप करण्यात आलेल्या आणि आधारकार्ड क्रमांक मिळवण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विहित प्राधिकरणाला त्याचे आधारकार्ड सूचित करणे आवश्यक आहे. किंवा ३१ मार्च २०२३ पूर्वी, विहित शुल्क भरून ते लिंक करणे गरजेचे आहे. असे करण्यात अयशस्वी झालेल्यांना कायद्यानुसार १ एप्रिल, २०२३ पासून त्याचे परिणाम भोगावे लागतील असे कळविण्यात आले होते. मात्र आता पॅन आणि आधार लिंक करण्याच्या उद्देशाने विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती देण्याची तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
१ जुलै, २०२३ पासून, आवश्यकतेनुसार, आधारकार्ड सूचित करण्यात अयशस्वी झालेल्या करदात्यांचस पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि पॅनकार्ड निष्क्रिय राहण्याच्या कालावधीत त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

१) अशा पॅनसाठी कोणताही परतावा दिला जाणार नाही;
२) ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय राहते त्या कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही; आणि
३) TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील/संकलित केले जातील, कायद्यात प्रदान केल्याप्रमाणे.
१,००० रुपये शुल्क भरल्यानंतर विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती दिल्यानंतर ३० दिवसांत पॅनकार्ड पुन्हा सुरू करता येईल.
ज्या व्यक्तींना पॅन-आधार जोडणीमधून सूट देण्यात आली आहे त्यांना वर नमूद केलेले परिणाम लागू होणार नाहीत. या श्रेणीमध्ये विशिष्ट निर्देशित राज्यांमध्ये राहणारे, कायद्यानुसार अनिवासी, भारताचे नागरिक नसलेली व्यक्ती किंवा मागील वर्षात कोणत्याही वेळी ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो.
आतापर्यंत ५१ कोटींहून अधिक पॅनकार्ड आधारकार्डशी जोडले गेले आहेत. https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar ह्या लिंकवर प्रवेश करून पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले जाऊ शकते.
(The gadvishva) (the gdv) (adhar pan link) (addhar card pan card linking)