महाज्योती अंतर्गत ‘या’ प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ; देण्यात येतो मोफत टॅब

798

– दोन वर्ष प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली,२८ जून : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर मार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी करिता १० वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदरचे प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा देण्यात येतो. १० वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. या करिता महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना ०५ जुलै २०२३ पर्यत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
तसेच ज्या उमेदवारांनी या आधी जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन देखील महाज्योती मार्फत करण्यात आलेले आहे. असे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here