सावली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

1149

– व्याहाळ खुर्द उपवन क्षेत्रा अंतर्गत निलसनी पेठगांव येथील घटना
The गडविश्व
ता. प्र / सावली, ७ डिसेंबर : सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर (४७) र. निलसनी पेठगाव ता. सावली जि. चंद्र्पुर असे मृतकाचे नाव आहे.
सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र २०१ हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर आहे. दिवसा धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारासह शेतात काम करताना दिसतात किंवा जंगल परिसरात सर्पनासाठी जात असतात. या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात. घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता परंतु उशिरा पर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. घटनेच्या दुस ऱ्या दिवशी शेता लगत असलेल्या वनात त्याचा शोध घेतला असता सरपटत गेल्याच्या खुना जानवल्याने त्याचदिशेने दिशेने मृतकाचे शव निदर्शनाश आले. वाघाने मृतकाच्या शरीराचे अर्धे अधिक शरीर फ़स्त करुण केवळ धळ शिलक ठेवले होते. शेत शिवारालगत जंगल असल्याने मृतक शेता लगत कक्ष क्र २०१ या भागात गेला होता. त्यामुळे जंगल परिसरातील झुडपात दब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुण मृतकास फरकळत नेऊन ठार केले. सदरची घटना मंगळवार रोजी दुपारी २ वाजताची असून दुसऱ्या दिवशी शोध मोहिम दरम्यान वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याचे निदर्शनात आले. परिसरात वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची कल्पना होताच लगलीच वन अधिकारी घटनास्थळ गाठून मौका पंचनामा करुण मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणी साठी पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मृतकाच्या पाश्च्यात पत्नी एक मुलगा, मुलगी असा आप्त परिवार असून मृतका च्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(The Gadvishva) (Chandrpur News Updates) (Farmer killed in tiger attack) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here