शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली : आरमोरी येथे मका खरेदी केंद्र सुरु

222

-आमदार गजबे यांच्या हस्ते मका खरेदी केंद्राचे शुभारंभ
The गडविश्व
ता.प्र. /आरमोरी, ३० मे : तालुक्यातील प्रतीक्षेत असलेल्या मका खरेदी केंद्राची अखेर सुरुवात करण्यात आली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते मका खरेदी केंद्राचे शुभारंभ २९ मे रोजी करण्यात आले.
आजपर्यंत काही शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला मका कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विकला. तर काही शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीच्या भरोशावर साठवून ठेवलेला होता. आज शासकीय खरेदीचे भरोशावर असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोरील आदिवासी महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला असून मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपआपला माल विक्री करण्यासाठी जे शेतकरी प्रतीक्षेत होते त्यांची प्रतीक्षा संपलेली असून लवकरच शासकीय आधारभूत किमतीवर त्यांचा मका खरेदी केला जाणार आहे. या मका खरदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले सहकारी सोसायटी आरमोरीचे कर्मचारी व आरमोरी क्षेत्राचे आमदार तसेच मका उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. मका खरेदी केंद्राच्या शुभारंभ होताच ज्या शेतकऱ्याचा मका सर्वप्रथम खरेदीसाठी प्रथम क्रमांक लागला असे शेतकरी विष्णुपत गाईन, शंकर नगर येथील असून त्यांचा आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

(the gdv, the gadvishva, gadchiroli armori, mla gajbe)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here