वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सरसकट गुन्हे दाखल करा : माजी आमदार डॉ.उसेंडी

219

– गडचिरोली जिल्ह्यात वाघ आणि रानटी हत्तींचा दहशत
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यात हत्तीची व नरभक्षक वाघांचे दहशत माजली असून येथील नागरिकांना मृत्यूचा सामना करावा लागत असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसानही होत आहे. वनविभागाकडे अद्यापही अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे नाहीत, ज्या गावाशेजारी हत्ती असतील त्यांचा शोध घेऊन तेथील शेतकऱ्यांना सतर्क करू शकतील मात्र या हलगर्जीपणामुळे शेतकरी बांधवाना जीव गमावावा लागत असल्याने वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सरसकट गुन्हे दाखल करण्यात यावे असे मत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्ती व नरभक्ष वाघांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले असून वनमंत्री, पालकमंत्री व वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व नागरिकांचा जीव जात आहे . धान पीक कापणीवर आले आहे, जिल्ह्यातील अनेक भागात कापणी व मळणीचे काम चालू झाले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त वेळ शेतात राहावे लागत आहे, अश्यात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचाही हला वाढत चालले आहे. हत्तीकडून हातात आलेल्या पिकाची नुकसान होत असल्याने नाईलाजास्तव धानाची राखण करावी लागत आहे, मात्र इतक्या दिवसात हत्ती आणि वाघाचे हल्ले वाढत चालले असतानाही वनविभागाकडे अद्यापही अत्याधुनिक यंत्रणा नाही यामुळे शेतकरी बांधवाना जीव गमावावा लागत आहे. त्यामुळे वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सरसकट गुन्हे दाखल करण्यात यावे असे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here