अखेर आदिवासी विकास विभागाने शाळेच्या वेळेत केला बदल

438

– सुधारित परिपत्रक निघाले
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०४ : दिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सायंकाळी पुरेसा खेळ खेळण्यासाठी वेळ मिळावा व इतर उपक्रमासाठी व अभ्यासासाठी वेळ मिळावा याच उद्देशाने ३ फेब्रुवारी २०२५ च्या परिपत्रकात शाळेची वेळ सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० करण्यात आल्याचे सुधारित परिपत्रक काढण्यात आले.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या वार्षिक व वेळापत्रका बदल करण्याची मागणी वांरवार केली जात होती. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सायंकाळी खेळण्यासाठी, इतर उपक्रमासाठी व स्वंय अध्ययनासाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच त्यांच्या दिनक्रमात सुसुत्रता असावी या उद्देशाने ५ जुलै २०२३ रोजीच्या पत्रान्वये आश्रमशाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.
शाळेची वेळ पुर्ववत ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध शिक्षक संघटनांकडून मागणी होत होती. सदरील बाब विचारात घेऊन, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेसंदर्भात ५ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेले शासन पत्र रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीस अनुसरुन शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या शालेय कामकाज, भोजन आणि अल्पोपहारासंदर्भातिल पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांची वेळ पुर्विप्रमाणेच सकाळी ११.०० ते ५.०० कायम ठेवण्यास मान्यता देण्यात येत्त आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक आदिवासी विभागाने काढले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here