– कंकडालवार यांच्याकडून गरीब व गरजूवंतांसाठी मदतीचे कार्य सुरूच
The गडविश्व
आलापल्ली, दि. ०३ : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.२ मधील टेकडी कॉलनी श्रमिक नगर येथील रुक्साना रियाज शेख यांचे राहते घर काल झालेल्या सततधार पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे घराला लागून असलेल्या सागाचे झाड अचानक घरावर कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सदर महिला ही बेघर झाली होती.
मात्र या घटनेची माहिती मिळताच आलापल्ली येथील कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व माजी ग्रा.प.सदस्य सलीम शेख यांनी संबधीत घराची पडझड व नुकसानग्रस्त महिलेला काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार यांचे अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात नेऊन त्यांची घराची परिस्थिती कंकडालवार यांना सांगितले.
यावेळी कंकडलवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर नुकसानग्रस्त महिलेला घराची दुरुस्तीसाठी आपल्यापरीने आर्थिक मदत दिली तसेच आल्लापल्ली येथील घराची नुकसानग्रस्त महिलेला महसूल विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
आल्लापल्ली येथील घराची नुकसान झालेल्या महिलेला घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करतांना कंकडालवार यांचे जनसंपर्क कार्यालयात अजय कंकडालवार यांचे समवेत स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, सलीम शेख माजी ग्रा.प.सदस्य आलापल्ली, सलीम रियाज शेख, राहुल भीमराव गावडे, बल्याभाऊ ओडेट्टीवार, प्रकाश दुर्गे, पुणेशभाऊ कंदिकूरवार आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे युवा नेते अजय कंकडलवार यांच्या हाती सत्ता असो किंवा नसो, स्वतः जवळ एखादे पद असो किंवा नसो पण अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब व गरजूवंतासाठी त्यांचे एक हात मदतीचे निरंतर सामाजिक कार्य सुरू आहे हे मात्र इथे उल्लेखनीय आहे.