मोहली येथील विज्ञान प्रदर्शनीत चंदू रामटेके यांच्या साहित्याला प्रथम पारितोषीक

19

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २२ : तालुकास्तरीय विज्ञान तथा शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनी २०२४ चे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मोहली, पंचायत समिती धानोरा येथे २०२ व २१ डिसेंबर २०२४ ला आयोजित करण्यात आली होती. यात प्राथमिक गटातून शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती या स्पर्धेमध्ये चंदू पुंडलिक रामटेके पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरूमगांव यांनी प्रथम क्रमांक पटकावले आहे. ‘मनोरंजनातून शिकू, व्याकरण’ हा त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा विषय होता.
त्यांच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, मुख्याध्यापक रेवनाथ चलाख, वीणा मडावी, डॉ. विजयकुमार रामटेके, जगदीश बावणे, गायत्री खेवले, कालिदास वटी, विजय नंदनवार, गुरुदेव पेंदाम, सोनसिंग धनगुन, शिला रामटेके, एन. एन. मुल्लेवार,पांडुरंग कांबळे, रमेश जेंगठे,मुक्तेश्वर खोब्रागडे, रविता गेडाम, ए. एल. जनबंधू, पुंडलिक पेंदाम,बाळकृष्ण बोरकर आदींनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय प्रदर्शनी साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here