-डॉ. उसेंडी भाजपच्या वाटेवर ?
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आज डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. उसेंडी यांनी राजीनामा दिल्यानंतर चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडीया यांनी त्यांची भेट घेतली आहे. यामुळे डॉ. उसेंडी भाजपात प्रवेश करणार काय याकडे लक्ष लागले आहे. एकंदरीत भांगडीया आणि उसेंडी यांच्यात बंद दरवाज्यात चर्चा सुरू असून भाजपचे काही कार्यकर्ते उसेंडी यांच्या घरासमोर जमलेले पहावयास मिळत आहे.
आमदार भांगडीया घेऊन गेले डॉ. उसेंडी ला वाहनात
आमदार बंटी भंगडीया यांनी आज डॉ. उसेंडी यांची भेट घेतली त्यानंतर भांगडीया यांच्यासह डॉ. उसेंडी हे वाहनात जातांना दिसले त्यामुळे एकूणच डॉ. उसेंडी हे भाजपात प्रवेश करतील का ? याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांची पक्षावर नाराजी, दिला अध्यक्ष पदाचा राजीनामा, भाजप आमदार बंटी भांगडीया भेटीला
– डॉ.उसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार ? बंद दरवाज्याआड दोघात चर्चा. #thegdv #gadchirolinews #thegadvishva #bjp #congress pic.twitter.com/NxmOewjqWZ— THE GADVISHVA (@gadvishva) March 26, 2024
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024