माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची लंबडपल्ली गावातील नागरिकांना भेट व विविध समस्यावर चर्चा

120

The गडविश्व
सिरोंचा, २५ ऑगस्ट : तालुक्यातील अंकीसा परिसरातील गावात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देत विविध समस्यांवर चर्चा केली.
लंबडपल्ली गावातील नागरिकांची भेट घेऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी नागरिकांशी संवाद साधून पूरस्थिती,नाले, पूल, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व गावांतील विविध समस्यावर चर्चा केली. चर्चेदरम्यान लंबडपल्ली येथील नागरिकांनी आमच्या गावातील समस्या दूर करा अशी विनंती बी.आर.एस नेते माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष आविस दिपकदादा आत्राम यांच्या कडे केली. यावेळी आत्राम यांनी आपल्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याच्या प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यावेळी लंबडपल्ली गावातील नागरिकांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, गरकापेठाचे सरपंच सुरज गावडे, माजी सरपंच विजय कुसनाके, सिनु दुर्गम, वासू सफाट, सारय्या दुर्गम, जुलेख शेख, गणेश राच्चावार, चंद्रमोगली माडेम सह आविस व बी.आर.एस कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here