माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली विषबाधित विद्यार्थीनींची तपासणी

223

The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील १०६ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. घटनेची माहिती कळताच माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट दिली. भेटीदरम्यान स्वतः डॉ. उसेंडी यांनी विद्यार्थींची तपासणी करत त्यांची विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी घटनेची माहिती दिली.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास आलूकोबीची भाजी, वरण भात, असे जेवण केल्यानंतर काही वेळाने मळमळ, उलटी, हगवण सुरू झाले. नंतर शिक्षकांना कळवण्यात आले. शिक्षकांनी धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे उपस्थित डॉक्टर यांनी माहिती दिली. भोजनाचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदारांनी ताजे भाजीपाले, व अन्नधान्य पोहचवावे. सोबतच आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी अन्नधान्य , जेवण तपासून विद्यार्थ्यांना द्यावे. सदर घटनेची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे.
यावेळी एयसीएस डॉ. साळुंखे, फीझिसीएन डॉ.मनीष मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी हसनअली गिलानी, डॉ. विनय उसेंडी, गडचिरोली विधानसभा समन्वयक पंकज खोबे , दत्तात्रेय करंगामी, सुहास करंगामी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here