मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे फॉउंडेशन दिवस उत्साहात साजरा

243

The गडविश्व
गडचिरोली, १५ फेब्रुवारी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली जिल्हात मागील दोन वर्षांपासून १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी”खेळाच्या माध्यमातून विकास व विषयात्मक शिक्षण” सत्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य – संवाद कौशल्य, संघकार्य,समस्या सोडविणे, शिकण्यातून शिकणे, स्व – व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण – संख्या ज्ञान व भाषा ज्ञान, कार्यात्मक इंग्लिश आदी क्षेत्रावर काम करीत आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली अंतर्गत १४ फेब्रुवारीला मॅजिक बस गडचिरोली, आंबेशिवनी व बाम्हणी येथे फॉउंडेशन दिवस विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती सोबतच केक कटिंग, बेस्ट अवार्ड वितरण व बाम्हणी येथे मुलांसाठी विविध स्पर्धा,तर आंबेशिवनी येथील मुलांनी ग्रिटींग कार्ड्स तयार करून मॅजिक बस दिवस साजरा केला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅजिक बस हि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीने काम करते याबद्दल क्लस्टर मॅनेजर देवेंद्र हिरापुरे यांनी माहिती सांगितली तर मॅजिक बस ची सुरूवात आणि प्रवास या संदर्भात जीवन कौशल्य शिक्षक नागेंद्र नेवारे यांनी माहिती दिली. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला युवा मार्गदर्शक रोशन तिवाडे, प्रफुल निरुडवार, पंकज शंभरकर यांनी सहकार्य केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने गडचिरोली तालुक्याचे तालुका समन्वयक देवेंद्र हिरापूरे, जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे, नागेंद्र नेवारे आणि विषय शिक्षिका रीना बांगरे, बारुबाई शेडमाके, प्रवजा उंदिरवाडे, विशाल पाऊलबुद्दे, युवा मार्गदर्शक प्रफुल निरुडवार, रोशन तिवाडे, पंकज शंभरकर, सोनी सिउरकर, अस्विनी उराडे, दीपक ढपकस यांच्या सहकार्यातून पार पाडण्यात आला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) ( The Gdv) (Magic Bus)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here