The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १० : येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ९ डिसेंबर ला संस्थापक दिन साजरा करण्यात आला.
के. आर .दखणे आदिवासी विकास शिक्षण संस्था मुरूमगाव चे संस्थापक स्व. केवळरामजी दखणे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष श्रीमती कमलाबाई दखणे यांच्या हस्ते बाबूजींच्या व दिवंगत संस्था सचिव महेशजी दखणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर मौन श्रद्धांजली घेण्यात आली.
याप्रसंगी संस्था सचिव महेंद्र दखणे,कोषाध्यक्ष करिमाताई देवानी, सदस्य कृपाराम भुरकुरिया, हरिराम कवाडकर, संदिप्ता लाडे, मंगला उईके, शीतल दखणे, रोशनी दखणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक महेंद्र जांभूळकर यांनी बाबूजींच्या जीवन चरित्रायावर प्रकाश टाकला. आदिवासी बहुल मुरूमगाव सारख्या ग्रामीण परिसरात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याने शालेय जीवनात अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत असे प्रतिपादन केले.
बाबूजींच्या स्मृतीदीनानिमित्य शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . विजेता संघास प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन जी. जे. चिंचोलकर यांनी केले. आभार बी. जे. बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास चौधरी, रमेश निसार , संजय पोहणे, सरस्वतीबाई दाने, रजुलाबाई कोलियारा,रामधर राणा, सुरेश तुलावी आदींनी परिश्रम घेतले.