The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : स्थानिक जिल्हा परीषद हायस्कूल मधील चार विद्यार्थी एन. एम. एम.एस. शिष्यवृत्त्ती परीक्षा २०२३-२०२४ मध्ये पात्र ठरलेले आहेत.
यामधे कुमारी सानिका सुनील चौधरी (चीचोली ), कुमारी साक्षी कालिदास पदा (मेंढा), नयन रमेश मडावी, हेमंत ठोमदेव नैताम (लेखा ) हे विद्यार्थी पात्र ठरले. शाळेतील एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामधे १० विद्यार्थी पास झाले. परंतु यापैकी ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती धारकांना प्रतिवर्षी १२००० रुपये प्रमाणे ५ वर्षापर्यंत एकूण ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
वर्ग ५ वी मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती करिता कुमारी संस्कृती होळी हीची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील सहाय्यक शिक्षक पी. व्ही.साळवे, कुं.रजनी मडावी, एस. एम.रत्नगिरी, कोल्हटकर यांनी अधिकचे वर्ग घेऊन परीक्षेची तयारी करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.सुरजुसे आणि सर्व शिक्षकांना दिले आहेत.
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गटशिक्षणाधिकारी एस. वाय.आखाडे, मुख्याध्यापक व्ही.एम. सुरजुसे, शाळा समिती अध्यक्ष श्री प्रभाकर खोबरे, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती , सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
(#thegdv #thegdv #gadchirolinews #dhanora #nmmsexam #scholashipexam )