The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि. २७ : इयत्ता पाचवीच्या सन 2024-25 सत्रातील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरुमगाव येथील चार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. कु. सुहानी जितेंद्र संगोडीया, कु. उर्वशी दिपक सांडील, कु. खुशबू विजय मिस्त्री आणि कु. शताब्दी बालेन्द्र मेश्राम या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचेही हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विशेषतः वर्गशिक्षक बावणे यांचे मोलाचे योगदान असून त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. मुख्याध्यापक रेवनाथ चलाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक चंदु रामटेके, गायत्री खेवले, सुमन किरंगे, जगदीश बावणे, रुपेश शिवणकर, रविता शेडमाके आणि संगीता भडके यांनी अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
या चार विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळा आणि परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
