मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण

258

The गडविश्व
येणापूर,दि.०३ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. (एम के सी एल ) पुणे यांच्या द्वारे , छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे . सदर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील एम के सी एल च्या मान्यताप्राप्त निवडक प्रशिक्षण केंद्रातही सुरु असून, जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन संगणक कौशल्य आत्मसात करावे अशी माहिती ग्राम पंचायत नवेगाव माल ता.चामोर्शी येथील ग्रामसभेत चावडी वाचनातून देण्यात आली .
सदर माहिती माँ भारती कंप्युटर एज्युकेशन भेंडाळा चे संचालक मनोज मंगर यांच्या मार्गदशनाखाली , CSMS DEEP डिप्लोमा कोर्सला प्रशिक्षण घेत असलेला विद्यार्थी सचिन दिघोरे यांनी दिली . यावेळी , सरपंच सोमलता चौधरी , उपसरपंच चरणदास चौधरी , रवींद्र वाडगुरे , विमल बोलीवार , सचिव दुफारे , ग्राम पंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here