The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : समता फाउंडेशन मुंबई, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे नि:शुल्क नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आले. ज्या मध्ये ९८ शालेय विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी केली.
शिबिराचे उद्घाटन शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे, यु.जी.वाघाडे, एल.बी.कोडापे, एन.व्ही.गेडाम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.रुपेश भोयर, एम.एम.राउत, सी.एन.नरुले, एन.एस.कोहाडे, एम.एम.कुमरे, एम.ए.नवघडे, बी.आर.सोरते, सोनिका वैद्य, शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल बांबोळे, के.एक.मलोडे, शिवा भोयर व घनश्याम भोयर उपस्थित होते. शिबिरामध्ये नेत्र तपासणी डॉ.आनंदराव एस. तागवान प्राथमिक नेत्र चिकित्सा अधिकारी प्रा.आ. केंद्र कढोली, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा यांनी केले .
शिबीर यशस्वी होण्याकरिता आर.के.मोगरकर, आरोग्य अधिकारी समता फाउंडेशन मुंबई शाखा गडचिरोली व समता फाउंडेशन मुंबई चे संगणक प्रशिक्षक श्यामसुंदर हटवार, कु.अन्नपूर्णा हलामी डी.डी.टी. विभाग शिवाजी हायस्कूल कुरखेडा यांनी सहकार्य केले.