The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ३ एप्रिल : स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात उद्या ४ एप्रिलपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असून सावरकरांची प्रखर देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. याबाबत ३१ मार्च रोजी आयोजित पत्रपरिषदेत भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, शिवसेना जिल्हाध्यक्ष हेमंत जांबेवार, प्रमोद पिपरे, माजी शहराध्यक्ष योगिता पिपरे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अमिता मडावी, वैष्णवी नैताम, नीलम ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात ३० मार्चपासून स्वातंत्र्यसैनिक सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली आहे. ६ एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा काढण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात यात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर ६ एप्रिल रोजी चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमात यात्रेची सांगता होणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कोरची, धानोरा येथून तर दुपारी ४ वाजता कुरखेडा व गडचिरोली येथून ही यात्रा काढण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी आरमोरी येथे सकाळी १० वाजता व देसाईगंज शहरात दुपारी ५ वाजता, चामोर्शी येथे सायंकाळी ६ वाजता यात्रेची सांगता होणार आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)
