जि.प. प्राथमिक शाळा, सुवर्णनगर चा अनोखा उपक्रम

172

-प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन साजरा केला जागतिक महिला दिन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच श्रमप्रतिष्ठा व श्रममूल्याची जपवणूक व्हावी व मुलांना घडविण्यात आई वडील किती मेहनत घेतात याची जाणीव प्रत्यक्ष विध्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रोजगार हमी च्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामकरी कष्टकरी महिलांचा स्वागत व सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा केला. या उपक्रमाचे नियोजन सुवर्णनगर येथील उपक्रमशील शिक्षक पुंडलिक देशमुख यांनी केले.
याप्रसंगी रोजगार सेवक अनिल पदा, हिवराज देशमुख, राजू मेश्राम, पितांबर म्हशाखेत्री, चंद्रकांत राऊत, शा. व्य. समिती उपाध्यक्षा निरंकला पेंदाम, निर्मला देशमुख, कल्पना कलसार, रेखा मेश्राम,उषा मेश्राम, निता गुरपुडे, लीना झरले, कुसुम झरले,छाया डोमळे रेखा म्हशाखेत्री, विमल नरोटे, शेवंता कोवे इत्यादी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here