गडचिराेली : दुचाकीच्या अपघातात मामा- भाची ठार

2082

The गडविश्व
गडचिराेली, २७ जून : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून यात अनेकांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील एटापल्ली येथील महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी दुचाकीने जात असताना दुचाकीची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात मामा व भाची ठार झाल्याची घटना हृदयद्रावक तालुक्यातील वेलमागड गावाजवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (२५), रा. जीवनगट्टा असे मामाचे तर रोशनी बंडु पदा (२२), रा. पिपली (बुर्गी)) असे भाचीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावात गेला होता. दरम्यान ताे आपल्या गावी जिवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला असता नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्याने ती एटापल्लीपर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली.दरम्यान पिपली (बुर्गी) येथून निघाल्यानंतर गावाजवळून चार किमी अंतरावर वेलमागड गावानजीक दुचाकीची झाडाला धडक बसली. यात मामा व चुलत भाची गंभीर जखमी झाले यावेळी मामाला रुग्णालयात नेण्यासाठी भाची मार्गाने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करीत हाेती मात्र मामा नथ्थू हिचामी हा जागेवरच ठार झाला होता तर भाचीच सुद्धा उपचारादरम्यान मृतू झाला. ह्या हृदयद्रावक घटनेने रोशनी चे पुढील शिक्षणाचे स्वप्न अपूर्णच राहिले. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here