गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास

286

– विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑक्टोबर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तसेच दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. अनिल कवड़ मशाखेत्री ( ४०) ( पीडितेची ओळख पटू नये म्हणून गावचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे) असे आरोपीचे नाव आहे.
गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ३० मे २०१८ रोजी पीडित ही आपल्या घरी असतांना दुपारच्या सुमारास आरोपीने गोठ्यामध्ये तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान ती बेशुद्धा झाली. रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबातील व्यक्तीने शोधाशोध केली असता मिळून आली नाही. काही वेळाने ती गोठ्यात बेशुद्धावस्थेत मिळून आली. याबाबतची तक्रार ३१ मे २०१८ ला पोलीस ठाणे गडचिरोली येथे दाखल केली असता कलम ३६३, ३७६ (२) (३), व ३४२ भादवी तसेच कलम ४ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, तसेच अनुसुचित जाती जमाती कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून व तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात स्पेशल केस अन्वये दोषारोप दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपी अनिल कवडु मशाखेत्री यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी कलम ३६३, ३७६ (२) (३) व ३४२ भादवी तसेच कलम ४ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, मध्ये दोषी ठरवुन २० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कलम ३ अनुसुचित जाती जमाती कायदयान्वये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास एसडीपीओ डॉ. सागर कवडे व मपोउपनि / तेजस्वीनी संपत पाटील गडचिरोली यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here