गडचिरोली : ट्रक व अवैध दारुसह २५ लाखांचा मुद्देमाल

2150

– उपपोस्टे रेपनपल्ली पोलीसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात दारूबंदी असताना छुप्या मार्गाने दारूची तस्करी होणार आहे अश्या माहितीच्या आधारे उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली पोलिसांनी कारवाई करत ट्रक व अवैध दारू सह २५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संजय महिपत सावंत (वय ५१), रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व सुनिल प्रकाश पवार (वय ३२) रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असुन, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने २८ सप्टेंबर २०२४ एम एच १२एफ. झेड. ८९३१ क्रमांकाच्या ट्रकने काही इसम अहेरी ते सिरोंचा रोडने अवैध दारुची वाहतुक करणार असल्याच्या गोपनीय माहितीनुसार आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी उप-पोस्टे रेपनपल्ली पोउपनि. संतोष काजळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन सदर ठिकाणी रवाना करण्यात असता सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आलापल्ली ते सिरोंचा रोडवर कमलापुर टि-पॉईंट जवळ सापळा रचुन बसले असतांना, सकाळी ०६:०० वा. चे दरम्यान एक संशयीत ट्रक वाहन हे भरधाव वेगाने येतांना दिसले असता पोलीसांनी वाहन थांबविले. पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात ९० एम.एल रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारुचे ५०२ बॉक्स, प्रति बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकुण ५०,२०० नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल अंदाजे किंमत एकुण १७,५७, ००० रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले जुने टाटा कंपनीचे २५१८ सी मॉडेल ट्रक, वाहन क्र. एम एच १२ एफ. झेड. ८९३१ अंदाजे किंमत ८,००,०००/- रुपये असा एकुण २५,५७,००० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संबंधीत उपपोस्टे रेपनपल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीई विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेपनपल्ली पोउपनि. संतोष काजळे, पोउपनि. सतिश पवार, मपोउपनि प्रियंका मेश्राम, नापोअं नैताम, पोअ यादव, पोअं गायकवाड, पोअं तुंकलवार चापोअं चिंतमवार यांनी पार पाडली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here