गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते दहा लाखाचा धनादेश वितरित

99

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १२ : चातगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत सावरगाव कुरखेडा या गावातील शेत शिवारात शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून गर्भवती महिला शारदा महेश मानकर हिला ६ डिसेंबर २०२४ रोजी
ठार केल्याची घटना घडली होती. शासनातर्फे आर्थिक सहाय्य म्हणून त्या महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. त्यापैकी दहा लाखाचा धनादेश गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते ११ जानेवारी २०२५ ला सावरगाव कुरखेडा येथे आयोजित कार्यक्रमात सदर महिलेच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. उर्वरित पंधरा लाख रुपये पती व मुलगा यांच्या नावाने फिक्स केले जातील असे क्षेत्र सहाय्यक परशुराम मोहुरले यांनी सांगितले.
यावेळीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोडघरे, नंदू बाईलकर, जितेंद्र मुनघाटे गौरव येणप्रेड्डीवार, विपुल यल्लावार ,कुणाल ताजने, सुनील व्हि. सोनटक्के वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव, परशुराम डी. मोहुले क्षेत्र सहायक चातगाव, गणेश धंदरे वनरक्षक बामणी, संजू टेंभूर्णीकर वनरक्षक उ. जांभळी, वनीता सहारे वनरक्षक सावरगाव, विठ्ठल मेश्राम वनरक्षक चातगाव, दयाराम वरखेडे सरपंच, हलामी मॅडम, कापकर, शालिकराम कुंबरे वन समिती अध्यक्ष, पांडुरंग लोंढे, प्रमोद मडावी, वृंदाताई मडावी सरपंच व गावातील नागरिक सावरगाव चातगाव कुडकवाही कुरखेडा परिसतील नागरिक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here