गडचिरोली : नक्षल्यांसोबत उडाली चकमक, मात्र नक्षल्यांनी…

3476

– साहित्य जप्त, चार्जेबल आयईडी केला नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : छत्तीसगढ सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सावरगावजवळील जंगल परिसरात ५ जूनला सायंकाळी पोलीस नक्षल चकमक उडाली. मात्र या चकमकीतून नक्षल्यांनी जंगलाचा फायदा घेत पळ काढला. घटनास्थळावरून नक्षली साहित्य, स्फोटके तसेच एक आयईडी जप्त करून तो नष्ट केला.
गडचिरोली जिल्हा तसेच छत्तीसगढ सीमेलगत असलेल्या सावरगाव अंतर्गत येत असलेल्या कुलभट्टी गावाजवळील डोंगरावर टिपागड व कसनसूर दलमचे सदस्य तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अपर अधीक्षक कुमार चिंता यांना त्यांनी सी- ६० जवानांसह नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना असता सावरगाजवळ जवानांनी शोधमोहीम सुरु केली. दरम्यान जंगल परिसरात सायंकाळी नक्षल्यांनी जवानांक्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला असता जवानांनीही सावध पवित्रा घेत प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षली पसार झाले. परिसराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य, स्फोटके, पिट्टू बॅग आढळून आले. ते जप्त करण्यात आले तसेच कॅम्पजवळ सुरक्षा दलाला नुकसान पोहचाविण्याकरिता ठेवण्यात आलेला एक चार्जेबल आयईडी ६ जून रोजी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने नष्ट केला. दरम्यान नक्षली मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने होते मात्र गडचिरोली पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला आहे. तर निवडणूक संपताच पुन्हा एकदा नक्षली सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxl #firing #dhanoraforest #cgnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here