गडचिरोली : रानटी हत्तींचा कळप आता दिभना जंगल परिसरात

653

– शेतकरी धास्तावले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्ह्यात मागील वर्षांपासून ठान मांडून असलेल्या रानटी हत्तींचा कळप आता पोर्ला वन परिक्षेत्रातील साखरा जंगल बिटातुन २६ फेब्रुवारीला रात्रोच्या सुमारास दिभना जंगल परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे दिभना परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
रानटी हत्तींचा कळप दोन महिन्यांपासून पोर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात वावरत होते. दरम्यान हा कळप साखरा बिटातील जंगल परिसरात जवळपास १५ दिवस मुक्काम ठोकल्यानंतर आता दिभना जंगल परिसरात दाखल झाला आहे. दिभना पसिरात उन्हाळी धानपिक व इतर पिके असल्याने रानटी हत्तीच्या कळपाने परिसरात प्रवेश केल्याने शेतकरी धास्तावले असुन वनविभागाने जंगलामध्ये एकटयाने जावू नये, हत्ती दिसुन आल्यास छेडछाड करू नये असे आवाहन करण्यात आले असुन रानटी हत्तींच्या कळपावर वनविभागाने पाळत ठेवली आहे.
जिल्हयात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने आतापर्यंत मोठया प्रमाणात शेतपिकांची नासधुस केली आहे तसेच रानटी हत्तीच्या हल्ल्यात जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here