गडचिरोली : धावत्या एसटी बसने घेतला पेट

2008

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : जिल्हयात एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे आधीच नागरिक त्रस्त असतांना पुन्हा एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना आज ०१ मार्च रोजी निकतवाडा गावापासून २ किमी अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात घडली. एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. सदर घटनेत प्रवासी सुखरूप असुन प्रवासी भयभीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची बस मुलचेरा तालुका मुख्यालयापासून दररोज रात्रो मुक्कामी असते. ती बस दररोज सकाळी ६ वाजता मुलचेरा वरून घोट – चामोर्शी-भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जात असल्याची माहिती आहे. शुक्रवार १ मार्च रोजी एमएच ०७ सी ९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता प्रवाशांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती. घोट पासून ३ किमी अंतरावर जंगल परिसरात अचानक बसने पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली व आपला जिव वाचविण्याठी बसमधून उतरले. बसमध्ये जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती असुन सर्वच सुखरूप आहे.
सदर घटना ही एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचे कळते. चालक व वाहकांनी झाडाच्या फांद्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गडचिरोली जिल्हयातील भंगार बस च्या विविध घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. आता पुन्हा सदर घटना समोर आल्याने पुन्हा एकदा गडचिरोली जिल्हयातील बस चा प्रश्न ऐरणीवर आला असुन प्रवाशांमध्ये एसटी बस प्रती नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here