गडचिरोली : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग

2001

– पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, २७ जून : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा तेथे आधीच उभ्या असलेल्या वयस्कर व्यक्तीने स्कार्फ खेचून विनयभंग केल्याची घटना मंगळवार २७ जून रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अहेरी ठाण्यात दुपारी गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार २७ जून रोजी सकाळच्या सुमारास ती अहेरी उपजिल्हा रुग्णालय रोडवरील जिल्हा मध्यर्वती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता तेथे आधीच उभा असलेलय ५० वर्षीय व्यक्तीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तसेच पीडितेचा एक हात पकडून दुसऱ्या हाताने स्कार्फ खेचला व त्यानंतर असभ्य वर्तन केले. तो इसम हा रंगाने काळा, उंची अंदाजे साडेपाच फूट, डोळ्यावर चष्मा व जाड तसेच अंगात पांढरा शर्ट व निळसर पँट असा त्याचा पेहराव होता असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून अहेरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपस उपनिरीक्षक करिश्मा मोरे करीत आहे. तर एटीएममध्ये नेमके काय घडले याचा शोध घेण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील त्यानुसार कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here