-मूल मार्गावरील वैनगंगा नदीपुला नजीक अपघात
The गडविश्व
गडचिरोली, १४ एप्रिल : चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीपुला नजीक दुचाकी वाहनाची सुरक्षा रेलिंगला धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्रो ९ वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वाहन जळून खाक झाली तर दोघेजण ठार झाले. योगेश लोहाट (२३) रा. साखरा, निकेश बांबोळे (२१) रा. चुरचुरा आई अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, योगेश आणि निकेश हे गुरुवारी विवाह समारंभ आटोपून आपल्या मित्रांसोबत चंद्रपुर जिल्ह्यातील सावली परिसरात गेले होते. रात्रीच्यावेळी योगेश व निकेश हे दोघे एका दुचाकीने गावाकडे परतत होते. दरम्यान वैनगंगा नदी जवळील लहान पुलाजवळ पोहचताच दुचाकी अनियंत्रित होऊन सुरक्षा रेलिंगवर धडकली. यात योगेश व निकेशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
(The gadvishva) (the gdv) (vainganaga) (road accident) (gadchiroli news updates)