-दोघेजण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
प्रतिनिधी / अमिर्झा, दि. ०५ : दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अमिर्झा ते मुरमाडी मार्गावरील मौशीचक फाट्यावर घडली.
नामदेव सेलोटे (अंदाजे वय ६५) रा. मौशीचक असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे तर अनिल निलेकार, सुधीर सेलोटे दोघेही रा.अमिर्झा असे गंभीर जखमींची नावे असून जखमींवर गडचिरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सेलोटे व नामदेव सेलोटे हे अमिर्झा येथून मौशीचक च्या दिशेने दुचाकीने जात होते तर अनिल निलेकार हे मौशिचक च्या दिशेने अमिर्झा कडे येत असतांना मौशीचक फाट्यावर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात नामदेव सेलोटे हे जागीच गतप्राण झाले तर अनिल निलेकार आणि सुधीर सेलोटे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र अमिर्झा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #accident #amirza )