गडचिरोली : रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या उभ्या बैलगाडीला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार ठार

1457

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २७ : रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या उभ्या रिकाम्या बैलगाडीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार तर एकजन गंभीर जखमी झाल्याची घटना २७ डिसेंबर ला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील रांगी येथे घडली.
खट्या बोरुले ( अंदाजे वय ३५) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे तर राजु ठाकरे ( वय ३३) दोघेही रा. मानापूर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार एमएच ३३ एएफ ७३३८ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने दोघेजण रांगी येथील बायपास रोड ने मानापुरला जात होते. दरम्यान ताडाम यांच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या रिकामी बैलगाडीला चालक बोरुले यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची बैलगाडी ला जोरदार धडक बसली. त्यात दुचाकी वाहनचालक खट्या बोरुले जागीच ठार झाला तर राजु ठाकरे हा गंभीर जखमी झाला. जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथे उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here