गडचिरोली आगाराच्या भंगार बसचे स्टेरिंग फिरल्याने नाल्याच्या पिलरला धडक ; मोठा अनर्थ टळला

266

– प्रवाशी बालबाल बचावले
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २१ जुलै : मुरूमगाव येथून गडचिरोलीकडे जाणारी बस धानोरा येथील महसूल मंडळ कार्यालयाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांत गेली आणि गाडी चे स्टेरीग फिरल्याने नाल्यावरील खांबाला धडकल्याची घटना २१ जुळली रोजी दुपारी १.३० वाजता घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आणि मोठा अनर्थ टळला.
गडचिरोली आगाराची एमएच ४०एन ९५४४ क्रमांकाची बस मुरूमगाव येथून धानोरा कडे येत असताना महसूल मंडळ ऑफिस जवळ असलेल्या नाल्याजवळील रस्त्यावर असलेल्या ड्यांत गाडी गेल्याने बसची स्टेरींग फिरल्याने नाल्यांचा पीलरला धडकली व बस नाल्यात जाता जाता वाचली. ती बस नाल्याच्या पिलरला जाऊन अडकल्याने प्रवाशी बालबाल वाचले. यावेळी बस मधे ०८ प्रवाशी होते. या बस चालकाचे नाव टि.खेडेकर तर वाहकाचे नाव गौतम गेडाम असल्याचे कळते. गडचिरोली आगारातील अशा बस ने अनेकदा अपघात झाले असल्याचे दिसते. गडचिरोली आगाराला सध्या नवीन बसेसची गरज असून अशा होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकासह विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी सरकारने व जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, यांनी लक्ष घालून नवीन बस उपलब्ध करून द्यावे असे धानोरा येथील नागरिकांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here