गडचिरोली : झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला वृद्ध शेतकरी

962

The गडविश्व
गडचिरोली, ८ मार्च : जिल्हा मुख्यलयापासून जवळच असलेल्या मुडझा शेतशिवारात वृद्ध शेतकरी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर सिताराम सोनुले (६२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक मधुकर सोनुले हे सकाळच्या सुमारास घराबाहेर पडले. रंगपंचमी असल्याने ते गावातच रंग खेळत असतील असे कुटूंबियांनी वाटले मात्र दुपार होऊनही ते घरी न परतल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु केली असता शेतात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. तात्काळ घटनेची माहिती गडचिरोली पोलिस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Women’s Day quotes) ( Holi Wishes in Hindi) (Tu Jhoothi Main Makkar) (Valentine’s Day) (Logo) (March 8) (8 March) (Rana Naidu) (Saudi Arabia) (Sundar pichai) (DC vs UP WPL) ( Tu jhuthi Main Makkar) (Adani Group) (International Women’s Day) (Gadchiroli: An old farmer was found hanging from a tree)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here