गडचिरोली : रिक्त असलेल्या होमगार्ड पदांकरिता अर्ज आमंत्रित

358

The गडविश्व
गडचिरोली,दि. २५ : गडचिरोली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 145 होमगार्डचा अनुशेष भरणे करिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे केले आहे. याकरीता 25 जुलै ते 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषमध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड गडचिरोली यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक, गडचिरोली, कुमार चिंता यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #homguardgadchirolirecruyment)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here