-अधिकृत उमेदवार कोण ? चर्चेला उधाण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून २६ मार्च रोजी रिटायर्ड डीवायएसपी बारीकरावजी धर्माजी मडावी यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला. बीआरएसपीकडून हा दुसरा अर्ज असून अधिकृत उमेदवार कोण अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावेळी शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दर्शवत रॅली मध्ये भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्री जराते सुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे आता बिआरएसपी कुणाचे गणित बिघडवते याकडे लक्ष लागलेले आहे.
स्थानिक गांधी चौकात फटाक्यांची आतिशबाजी करत बिआरएसपी, शेकाप, हमर राज पार्टी सह काही आदिवासी संघटनांच्या शेकडो समर्थकांसह वाजत गाजत शहराच्या प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. पण विशेष म्हणजे २१ मार्च रोजी सातत्याने विविध प्रश्नावर लढणारे युवा नेते विनोद गुरूदास मडावी यांचा नामांकन अर्ज बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने दाखल केले असताना पुन्हा आज दुसरे अर्ज दाखल झाल्यामुळे BRSP चा नेमक उमेदवार कोण राहणार, याकडे लक्ष लागलेले आहे.
तळागडातल्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपणास जनहितेचे कामे करावयाच्या असल्याने भाजप-काँग्रेसच्या विरोधात पूर्ण ताकतीने आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असल्याचे रिटायर्ड डीवायएसपी बारीकरावजी मडावी यांनी कळविले.
यावेळी बीआरएसपी चे प्रदेश महासचिव संजय मगर, गडचिरोली जिल्हा प्रभारी राज बनसोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद वाळके, विनोद मडावी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता बांबोळे, शहर अध्यक्ष विद्या कांबळे, सचिव रेखा कुंभारे, प्रफुल रायपुरे, संघरक्षित बांबोळे मित्र पक्षांचे कार्यकर्ते व शेकडो समर्थक उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #brspgadchiroli #dyspbarikraomadavi #loksabhaelection2024 #gadchiroli_chimur_loksabha2024)