गडचिरोली : दुचाकीस्वारास ट्रकने चिरडले

2431

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : शहरातील आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना सोमवार ०५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मारोती धोंडुजी भोयर (वय ५०) रा. महादवादी असे अपघात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारोती भोयर हे शेतीसह दूध व्यावसाय करतात. नित्याप्रमाणे गडचिरोली येथे दूध ग्राहकांना दूध वाटप करून एमएच ३३ एए ३७७७ क्रमांकाच्या दुचाकीने स्वगावी परतत होते. दरम्यान कठाणी नदी पुलानजीक एमएच ३३ डब्लू २७८६ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचा चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याचे कळते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli accident, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here