गडचिरोली : पारस राउत याला वरिष्ट राज्य बॉक्सींग स्पर्धेत कास्य पदक

142

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : नुकत्याच १८ ते २१ डिसेंबर२०२४ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील रोगाव येथे झालेल्या वरिष्ट बॉक्सींग राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्हा बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू पारस हरिदास राउत याने ७५ ते ८० किलो वजनगटात कास्य पदक पटकावले आहे.
रोगाव येथे झालेल्या वरिष्ट बॉक्सींग राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेत आकाश यादव कुनघाडकर, लोमन काम्ताप्रसाद चनाप यांचा सहभाग राहीला.
पारस राऊत च्या यशाबददल जिल्हा किडा अधिकारी घठाळे, यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, संतोश गैनवार, महेश निलेकार, जिल्हा बॉक्सींग संघटनेचे जगदिश मस्के, प्रविण मेश्राम, अनिल निकोडे, रजत देशमुख, संजय मानकर, निखिल इंगळे, सुरज खोब्रागडे, राउटन्स जिम मित्र परिवारांनी अभिनंदनाचा वर्षांव केला आहे. पारस च्या या यशाबद्दल जिल्ह्याच्या मान आणखी उंचावली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here