गडचिरोली : पुरपरिस्थीतीने परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित

152

– परीक्षा पुढे ढकलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : मुसळधार पावसाने गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात पुरपरिस्थीती निर्माण झाल्याने याचा फटका आरोग्य विभागाच्या परीक्षार्थीना बसला असून सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशा मागणीचे निवेदन परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
सोमवार २२ जुलै रोजी आरोग्य सेवक पुरुष पदाची परीक्षा होती. परीक्षेचे केंद्र नागपूर येथे होते. परंतु गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे मार्ग बंद असल्याने नागपूर येथे परीक्षार्थी जावू शकले नाही. परीक्षेपासून वंचीत झालेले परीक्षार्थी चिंतेत पडल्याने त्यांनी सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना रुपेश वलके, संतोष करपे, सूरज मडावी, कुणाल कोवे, उमेश उईके, दीपक भारसागडे, रक्षित पोटवार, आकाश दास, अक्षय
गेडाम उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinewa #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here