-आज 8 उमेदवारांनी भरले अर्ज
The गडविश्व
गडचिरोली दि. २७ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या १२ झाली आहे.
डॉ. नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस), धीरज पुरूषोत्तम शेडमागे (जनसेवा गोंडवाना पार्टी), मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी), योगेश नामदेव गोन्नाडे(बहुजन समाज पार्टी), करण सुरेश सयाम (अपक्ष), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), विलास शामराव कोडापे (अपक्ष) या आठ उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर यापुर्वी अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पार्टी), बारीकराव धर्माजी मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष), हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) व विनोद गुरूदास मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष) या चार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांमार्फत शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९९ नामनिर्देशन अर्ज खरेदी करण्यात आले होते.
२८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolichimur #loksabha_election2024 #loksabhaelection2024 )